सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर- कापुरव्होळ रोडवर मंगळवार दि १८ सायंकाळी ८ च्या दरम्यान डंपर ( मिक्सर )व दुचाकी वाहनाच्या समोरासमोर घडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वारवरील दोन जण जागीच ठार झाले. मृत्यू झालेले सनी मोहन पवार , तुषार आण्णा पवार हे दोघेही भोर शहरातील आहेत.पुढील तपास भोर पोलिस करत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भोर - कापुरव्होळ रोडवरील भाटघर सांगवी गावच्या हद्दीत कापुरव्होळच्या दिशेने डंपर ( मिक्सर ) ( एम एच - ११ ए -५२३२ व जात होता. भोरच्या मार्गाने दुचाकी ( पल्सर एम एच ११ बी एफ ७६६०) स्वार वाले येत असताना समोरासमोर घडक होऊन अपघात झाला आहे. यामध्ये सनी मोहन पवार वय - २२ तर तुषार आण्णा पवार वय - २० दोघे राहणार अनंतनगर - संजयनगर भोर येथील असून या अपघातात हे दोघे जागी ठार झाली आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे करीत आहे.