सोमेश्वर रिपोर्टर टीम
बारामती दि ५ जानेवारी
बारामती तालुक्यामध्ये काल तपासणी केलेले नमुन्यांमध्ये १५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून शहरातील १२ तर ग्रामीण भागातील ३ जण पॉझिटिव्ह आले आहेत .मागील काही दिवसांमध्ये तालुक्यांमधील रुग्णसंख्या पाहता व काल तपासणी केलेल्या अहवालामधील आलेली रुग्णसंख्या दहा रुग्णांची वाढ दिसत आहे .
बारामती तालुक्यात आज पर्यंत ३० हजार ६४१ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून २९८११ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. ७८० जणांचा मृत्यू झाला आहे .