सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती पश्चिम ! वाघळवाडी मध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी अंबामाता महिला ग्रामसंघाची स्थापना

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाघळवाडी मध्ये महिला सक्षमीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती बारामती व ग्रामपंचायत वाघळवाडी यांच्या वतीने महिला सबलीकरण, सशक्तीकरण करण्यासाठी गावातील ३६ महिला स्वयंसहायता बचत गटांनी एकत्र येत या अंबामाता महिला ग्रामसंघाची स्थापना केली.
महिला ग्राम संघ स्थापन करण्यासाठी व माहिती देण्यासाठी पंचायत समिती तालुका समन्वयक अधिकारी श्री. लांडगे सर उपस्थित होते त्यांनी ग्रामसंघ कसा स्थापन करायचा व त्याचे फायदे तोटे या बाबत सर्व माहिती देऊन व महिलांचे शंकानिरसन करून ग्राम संघ स्थापन केला त्यानंतर झालेल्या मीटिंगमध्ये ग्राम संघाच्या अध्यक्ष म्हणून सरपंच नंदा सकुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष मालन सावंत, सचिव अनिता शिंदे, व खजिनदार/ लीपिका मनीषा जितेंद्र सकुंडे या सर्वांची मीटिंगमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली. विविध विषयांच्या कमिटी निवडण्यात आली. या ग्राम संघाच्या सर्व बचत गटातील अध्यक्ष, सचिव या ग्राम संघाच्या सदस्य म्हणून काम पाहतील व सर्व  गटांमधील   ४५१ महिला या ग्राम संघाच्या सभासद असतील.
सरपंच नंदा सकुंडे यांनी ग्राम संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्राम संघातील सर्व सदस्य महिलांचे आभार मानले यापुढे महिला सबलीकरण सशक्तिकरण, गावातील सर्व महिलांचे समस्या समजावून घेणे व त्याचे निराकरण करणे, बँक कर्ज प्रकरण करणे महिलांसाठी अभ्यास दौरे, सहलीचे नियोजन करणे व इतर सर्व कामे ग्राम संघातून या पुढे केली जातील असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. 
राष्ट्रवादीच्या महिला तालुका सरचिटणीस सुचिता साळवे यांनी या निवडीचे सर्वांचे स्वागत केले, खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून बचत गटांना लागणारी सर्व मदत केली जाईल असे त्यांनी सांगितले. या ग्रामसंघ निवडीसाठी तालुका समन्वयक अधिकारी श्री लांडगे सर, व तालुका गट समन्वयक रेश्मा मगर, कामकाज पाहिले.
उपस्थित तुषार सकुंडे होते. आभार वैशाली रमेश गायकवाड यांनी मानले.
        यावेळी HDFC बँक बारामती अधिकारी माधुरी लोंढे यांनी कर्ज प्रकरणाबाबत सर्व माहिती दिली प्रत्येकी बचत गटांना १.५ लाख ते २.५ लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात येईल व त्याबाबत लागणारे सर्व कागदपत्रांची पूर्तता त्या गावात स्वतः घेऊन पूर्ण करणार आहेत .बँकेकडून कमीत कमी व्याजदर आकारण्यात येतील असे सांगितले. 
बचत गट नियमित व वेळेवर कर्जफेड करतील त्या बचत गटांना बँकेकडून ६ % वार्षिक व्याजदराने कर्ज मिळेल त्या रकमेवरील होणारे ६ % व्याज  शासनाकडून बचत गटाच्या खात्यावर व्याजाची रक्कम ६ महिन्याच्या आत बचत गटाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल असे तालुका समन्वयक अधिकारी लांडगे यांनी याबाबत सर्व माहिती त्यांनी दिली.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7031,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती पश्चिम ! वाघळवाडी मध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी अंबामाता महिला ग्रामसंघाची स्थापना
बारामती पश्चिम ! वाघळवाडी मध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी अंबामाता महिला ग्रामसंघाची स्थापना
https://lh3.googleusercontent.com/-H--bODVjIq4/YdUYVialVPI/AAAAAAAAMlw/b8VmzujfeJMMR3kEWqJYy0s7TXtdjjlAQCNcBGAsYHQ/s1600/1641355339151375-0.png
https://lh3.googleusercontent.com/-H--bODVjIq4/YdUYVialVPI/AAAAAAAAMlw/b8VmzujfeJMMR3kEWqJYy0s7TXtdjjlAQCNcBGAsYHQ/s72-c/1641355339151375-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/01/blog-post_70.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/01/blog-post_70.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy