बारामती पश्चिम ! भोंडवेवाडी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे दि. १८ ( वार्ताहर ) 
बारामती तालुक्याच्या जिरायती पट्टयातील महत्वाच्या समजणाऱ्या भोंडवेवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची १३ जागांसाठी होणारी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली.  
        या संस्थेची सन २०२१ - २२ ते २०२६ - २७ या कालावधीसाठी १३ जागांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहिर झाला होता. त्यानुसार मंगळवारी ( दि. १८ ) अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी १३ जागांसाठी १३ अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी अमर गायकवाड यांनी दिली. याकामी संस्थेचे सचिव संजय जाधव, विठ्ठल गोसावी यांचे सहकार्य मिळाले. 

     या संस्थेत फक्कड भोंडवे, सोपान भोंडवे, हरिभाऊ भोंडवे, प्रकाश भोंडवे, हनुमंत शेळके, आप्पा भोंडवे, नीलेश भोंडवे, कालिदास भोंडवे, नारायण कदम, गणेश जाधव, रमेश मेरगळ तर महिला राखीवमधून उषाताई भोंडवे, अंजनी भोंडवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या बिनविरोध निवडीकामी सर्व सभासद आणि ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.  
      बारामती येथील राष्ट्रवादी भवनमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित बिनविरोध संचालकांचा सत्कार करण्यात आला. 

     
To Top