सोमेश्वर रिपोर्टर टिम
बारामती दि २०
बारामती तालुक्यामध्ये मागील एक महिन्यापासुन जिओ कंपनीची सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. ग्राहकांना कॉलड्रॉपचा त्रास सहन करावा लागत आहे. साधा एक कॉल लावायचा म्हटलं तरी चार ते पाच वेळा संबंधित व्यक्तीला कॉल लावावा लागतो. पण पुढील व्यक्ती कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असे सांगितले जाते आणि जर कॉल लागलाच तर तो कॉल अचानकपणे काही सेकंदांनंतर कट होतो. या कारणामुळे सर्व सामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर, वाणेवाडी, मुरुम, वाघळवाडी ,निबूत,खंडोबाचीवाडी ,गरदवाडी ,करंजे, चौधरवाडी, लोणी भापकर, देऊळवाडी , मासाळवाडी, मुर्टी ,मोरगाव, सुपा,का-हाटी, वडगाव नि ,कोऱ्हाळे बु ,मुढाळे, ढाकाळे, पणदरे, माळेगाव इतर गावे व वाड्या वस्त्या या भागातील नागरीक हॅलो हॅलो करून वैतागले आहेत.
त्यामुळे आता ग्राहकांनी या कंपनीरन पोर्ट आऊट होण्याचे हत्यार उपसले असून विविध कंपन्यांमध्ये ग्राहक आता आपले सिम करत इतर कंपन्यांमध्ये पोर्ट करण्यासाठी मोबाइल दुकानाच्या पुढे गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे जिओ सोडून विविध कंपन्यांच्या सिमचा तुटवडा बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात भासु लागला आहे .
----------------------
तक्रारी करुनही सुधारणा नाही----------
जिओच्या अनेक ग्राहकांनी संबंधित तालुकाच्या जिओ अधिकाऱ्यांना फोन करून कॉल ड्रॉप व नेटवर्क संबंधित तक्रारी दिल्या आहेत. या तक्रारीवरती समाधानकारक उत्तरे मिळत नसून आमच्या कंपनीची कुठेतरी काम चालू आहे लवकरच सर्व व्यवस्थित होईल असे मागील एक महिन्यापासून उत्तरे मिळत असल्याने ग्राहक पैसे देऊनही आम्हाला सेवा व्यवस्थित मिळत नाहीत. पोर्ट आऊट होण्याचे हत्यार ग्राहकांनी उपसले आहे.