सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकार संघ भोर तालुका अध्यक्षपदी मधुकर कानड यांची निवड करण्यात आली. कानडे राजगड साखर कारखान्यात युनियन लीडर असून गेली १६ वर्षे सलग नेरे ता.भोर येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.त्यांचा समाजातील जनसंपर्क दांडगा असून संघटनात्मक बांधणी उत्तम रीतीने करीत आले आहेत.
कानडे यांना संस्थापक अध्यक्ष सुरेशराव पोटे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.त्याप्रसंगी राष्ट्रीय स्वाभिमानी चर्मकार संघाचे संस्थापक सचिव जयदेव इसवे, विश्वस्त कार्याध्यक्ष पुणे जिल्हा (उत्तर) विनायक जाधव, कार्याध्यक्ष पुरंदर तालुका नितीन पोटे, राजेंद्र सातपुते उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, कार्याध्यक्ष पुणे जिल्हा (दक्षिण) सचिन पवार, उपाध्यक्ष भोर तालुका विष्णू काळे, उपाध्यक्ष प्रशांत भोसले उपस्थित होते.