सोमेश्वर रिपोर्टर टिम - - - -
सोमेश्वर दि २०
आज सकाळी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणार्या करंजेपूल येथील आउटपोस्ट या ठिकाणी नीरा बारामती रस्त्यावरती विना मास्क फिरणार्या नागरिकांवर कारवाई करत दंड वसूल करण्यात आला .
सध्या देशात कोरोनाच्या तिसर्या लटेचा कहर सुरु असुन रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे .आज बारामती तालुक्यामधील रुग्ण संख्या दोनशे च्या उंबरठ्यावर आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात असून .
वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे पीएसआय शेलार यांच्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की घरातून बाहेर पडत असताना मास्क लावणे आवश्यक आहे सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर राखावे तसेच व्यावसायिकांनी त्यांच्या स्टॉलवरती ग्राहकांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन शेलार यांच्याकडून करण्यात आले आहे .