पुरंदर ! नागरिकांनी शारीरिक तंदुरुस्ती जपावी : हनुमंत कामठे : भिवरी येथे आमदार संजय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क व सॅनिटायझरचे वाटप

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
गराडे : प्रतिनिधी
सध्या जगभर कोरोनाच्या महामारीने थैमान घातले आहे. कोरोनाने अनेकांचे जीव घेतले आहेत. ज्यांचे आरोग्य चांगले आहे त्यांचाच कोरोना किंवा इतर आजारातून निभाव लागताना दिसत आहे. त्यामुळे उत्तम आरोग्य ही संपत्ती आहे. नागरिकांनी शारीरिक तंदुरुस्ती जपावी असे आवाहन काँग्रेस नेते हनुमंत कामठे यांनी केले.
    भिवरी (ता. पुरंदर) येथे पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भिवरी 
युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने कोव्हिड प्रतिबंधक म्हणून मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. त्यावेळी हनुमंत कामठे बोलत होते.
      यावेळी निरा मार्केट कमिटी माजी उपसभापती ईश्वर बागमार, भिवरी गावचे सरपंच  दिलीप कटके , उद्योजक सोपान कुंजीर ,  पुरंदर मिल्क अँड मिल्कचे संचालक म्हस्कू दळवी , विशाल नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक सखाराम कटके,  काँग्रेस संघटक प्रकाश कटके, गणेश दळवी ,  किरण कटके  , विर नेताजी तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष माऊली दळवी , माऊली घारे, हरिदास दळवी, माजी ग्रा. पं. सदस्य नारायण कटके , अशोक कटके ,  विशाल ज्ञा. कटके ,  रामदादा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर कटके  , खादी ग्रामोद्योग पुरंदरचे संचालक  देवीदास साळूंखे , संदीप ला. कटके , भाऊसाहेब कामठे , नानासाहेब दळवी , युवा नेते हनुमंत साळुंखे ,  शशिकांत कटके , दादासाहेब कटके  , विठ्ठल कटके आदीसह  भिवरीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
                  कार्यक्रमाचे प्रास्ताविक माऊली घारे यांनी केले. सूत्रसंचालन  राजेंद्र ताम्हाणे यांनी केले. तर आभार  प्रकाश कटके  यांनी मानले.


To Top