अभिमानास्पद ! ढेकळवाडीच्या शेतकरी कुटुंबातील दयानंद घुले याची दिल्ली येथील भारतीय अनुसंधान केंद्रात तांत्रिक अधिकारी पदावर निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----     
काटेवाडी - ढेकळवाडी (ता बारामती) येथील शेतकरी कुटुंबातील दयानंद दतात्रय घुले यांची भारतीय अनुसंधान केंद्र दिल्ली  ( NPCIL)तांत्रिक आधिकारी (क्लासवन ऑफिसर)  या पदावर  निवड झाली आहे 
           दयानंद घुले यांची तांत्रिक आधिकारी या पदावर निवड झाल्याबद्दल घुले कुटुंबियांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली.  ढेकळवाडी सह परिसरातील नातेवाईक मित्र परिवार  यांनी दयानंद याचे अभिनंदन केले  धार्मिक पगडा असलेल्या वातावरणात वावरत असताना, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षणा चा श्रीगणेशा गिरवलेल्या श्री छत्रपती शिक्षण संस्थेत माध्यमिक शिक्षण घेतलेल्या  दयानंद च्या या यशाने कुटुंब आनंदित  झाले आहे.  त्याच्या या यशाबद्दल बोलताना आजी (वडिलांची आई ) म्हणाल्या की ....माझा दया लय मोठा आफिसर झालाय असे सांगताना .वयोवृद्ध  आजोबा, आई वडिल,चुलते, चुलती ,भाऊ याचे डोळे आनंदाश्रूने भरून आले.
To Top