सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : मनोहर तावरे
सुपा- मोरगाव या रोडवर सोमवार दि.२१ रोजी एका मालवाहू कंटेनर ची दोन वाहनांना विचित्र धडक बसून अपघात झाल्याची घटना ताजी आहे.
तीन वाहनांच्या झालेल्या धडकेत पुणे येथे उपचार घेत असलेल्या जखमी पैकी बाबासाहेब वाडेकर यांचा पुणे येथे काही वेळापूर्वी मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.
याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातून दोन चारचाकी गाड्या जेजुरी येथील दर्शनासाठी जात असताना सुपा येथील धोकादायक वळणावर हा अपघात घडला. डायमंड हॉटेल जवळ चार चाकी गाडीतील बाबासाहेब वाडेकर यांना जबर मार लागला होता. मयत वाडेकर हे वन विभागात नोकरीला आहेत.
पुणे येथील रुबी हॉल या दवाखान्यात उपचार घेत असताना त्यांचा आज मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.वडगाव -निंबाळकर पोलीस ठाण्याचे अंतर्गत सुपा येथे या घटनेची यापुर्वीच नोंद आहे.
......................................