सोमेश्वर रिपोर्टर टिम - - -
सोमेश्वरनगर
बारामती तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा दिनांक २६ जानेवारी रोजी ऑनलाइन होणार आहेत .तालुक्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या याला कारणीभूत असुन रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार होऊ नये म्हणून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे .
ऑनलाईन ग्रामसभेमध्ये सर्व सूत्रे नक्की कोणाच्या हातात असणार ? तसेच प्रत्येक ग्रामस्थाला स्वत चे म्हणणे व प्रश्न विचारण्याची संधी दिली जाणार कडे आता सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे .