पुणे, दि.२५:
माजी सैनिकांनी केलेली देशसेवा ही सर्वांसाठी प्रेरणादायक असून त्यांच्या त्यागावर देश उभा असल्याचे प्रतिपादन दक्षिण महाराष्ट्र मुख्यालय आणि गोवा सब एरियाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल इंद्रजीत सिंह यांनी केले.
सैनिक कल्याण विभाग आणि सिर्फ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विभागाच्या ‘रायगड’ सभागृहात माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, अवलंबित यांच्या मदतीसाठी विभागाने तयार केलेल्या www.mahasainik.maharashtra.
यावेळी सैनिक कल्याण विभागाचे संचालक प्रमोद यादव, उपसंचालक (प्रशासन) ले. कर्नल राजेंद्र जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे, सिर्फ फाँऊडेशनचे अध्यक्ष योगेश चितडे कार्यक्रमस्थळी तर सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती व्यास आणि निवृत्त ले. जनरल विनोद खंदारे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विविध योजनांचा लाभ आणि मदत देण्यासाठी संकेतस्थळ सुरू करण्याचा उपक्रम स्तुत्य असून त्याचा लाभ घेतला जावा, असे मत श्रीमती व्यास यांनी यावेळी व्यक्त केले.
ले. जनरल श्री. खंदारे म्हणाले, भारत हा माहिती तंत्रज्ञानात अग्रेसर देश म्हणून ओळखला जात असून आता सर्व गोष्टी संगणकीय प्रणालीद्वारे करणे काळाची आहे. माजी सैनिकांना या संकेतस्थळाच्या माध्यमातून घरातूनच सर्व सोई-सुविधा उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.
उपसंचालक प्रशासन ले. कर्नल श्री. जाधव यांनी संकेतस्थळाची माहिती दिली. मराठी तसेच इंग्रजी भाषेत उपलब्ध असलेल्या या संकेतस्थळावरील सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. यामध्ये विभागाचा इतिहास, जिल्हानिहाय जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमाक, ई-मेल पत्ते, विश्रामगृह, मुला-मुलींचे वसतीगृहे, सशस्त्र सेना ध्वज दिवस, माजी सैनिकांसाठी कल्याणकारी योजना, नागरिकांची सनद, माहिती अधिकार अधिनियम-२००५, विविध प्रपत्रे आदी माहिती देण्यात आलेली आहे.
यावेळी माजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल विपिन शिंदे, पॉयनिम कन्सल्ट प्रा. लि. चे संचालक पवन मोरे, वीरमाता व वीरपत्नी उपस्थित होत्या.