धक्कादायक!! राज्यात काल दिवसभरात एवढ्या जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Pune Reporter
सोमेश्वर रिपोर्ट टीम  - - - 
 मुंबई दि ८
राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रूग्ण वाढत असून   शुक्रवारी दि ७ कोरोना रुग्णसंख्येने कहर केला असून तब्बल ४० हजारांहून अधिक रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यातील आत्तापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या असून नागरिकांनमध्ये चिंतेच वातावरण आहे.  अनेक ठिकाणी निर्बंध लावले असून देखील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतच चालली आहे.
राज्यात  काल दिवसभरात ४०,९२५ नवीन कोरोना रुग्ण सापडले. राज्यात १४,२५६ बरे झाले असून २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या १,४१,४९२ एवढी असून ओमीक्रोन रुग्णसंख्या ८७६ वर पोहोचली आहे.
To Top