सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर येथील मु.सा.काकडे महाविद्यालयात १५ ते १८ वयोगटातील ४५० विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले या भव्य लसीकरण मोहिमेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव सतीश लकडे व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जगताप आर. एस. उपस्थित होते.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र दहा फाटा येथील आरोग्य सहाय्यक .मुलाणी, सौ निंबाळकर, श्री कसबे व त्यांचा स्टाफ यांनी लसीकरण करण्यास सहकार्य केले. यावेळी इयत्ता अकरावी व बारावी मधील ४५० विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिला गेला. यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.