बारामतीच्या शासकीय रुग्णालयातील स्विपरला अटक : बारामती तालुका पोलिसांची कामगिरी
सोमेश्वर रिपोर्टर टिम - -
बारामती दि ८
मला आई वडील नाहीत, मी एकटाच आहे. मी सरकारी नोकरीला असून अविवाहित असल्याची बतावणी करून शादी डॉट कॉम वरील अनेक मुलींना भुरळ पाडून लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्तापीत करून पैशांना गंडा घालून पोबारा होणाऱ्या सराईताला बारामती तालुका पोलिसांनी सापळा रचत भोर (जि. पुणे ) येथून अटक केली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार अजयकुमार नंदकुमार चटौला रा.रुई रुग्णालय शासकिय वसाहत बारामती (ता.बारामती जि.पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे आहे. याबाबत मुंबई येथील एका ३९ वर्षीय महिलेने लग्न संकेत स्थळावरून आरोपी अजयकुमार चटौला याने लग्नाचे आमिष दाखवत आपली पैशाची फसवणूक करून २१ डिसेंबर २०२१ रोजी बलात्कार व फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार आरोपीला गुरुवारी (दि. ६) रोजी अटक करून शुक्रवारी (दि.७) रोजी बारामती न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ११ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपी अजयकुमार चटौला हा बारामती येथील रुई शासकीय रुग्णालयात स्विपर म्हणून कार्यरत आहे. तो विवाहित असून देखील शादी डॉट कॉमवर मुलींना रेक्वेस्ट टाकून सरकारी नोकरदार असल्याचे सांगून त्यांच्याशी मैत्री करून लग्नाचे आमिष देत आपल्या जाळ्यात ओढून जवळीक साधायचा. त्यानंतर मुलींच्या घरच्यांना भेटून विश्वास संपादन करून मुलीला सोबत घेऊन फिरायला घेऊन जात होता. त्यानंतर मुलीशी शारीरिक सबंध प्रस्तापीत करून पैशांची गरज असल्याचे सांगून लाखो रुपए लुबाड्त असल्याचा प्रकार बारामती तालुका पोलिसांनी तपासात समोर आणला आहे.
मुंबईच्या महिलेच्या फसवणुकी नंतर आरोपी चटौला हा पुण्यातील दुसऱ्या मुलीसोबत नेहमीप्रमाणे खोटे बहाने करून तिला पळवून आणून भोर येथील एका रूमवर रहात असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे,पोलिस कॉन्स्टेबल मंगेश कांबळे,दत्तात्रय मदने,चालक तुषार लोंढे हे भोर येथे आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले होते. त्यानुसार अखेर बारामती तालुका पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळया आहेत.
यावेळी त्या मुलीला आरोपी चटौला मुलींची फसवणूक करत असल्याची हकीकत सांगून पुढील होणाऱ्या फसवणुकीला बळी पडण्यापासुन वाचवून मुलीची सुटका करत घरी जाण्याचा सल्ला दिला. यावेळी त्या मुलीकडून देखील गरज असल्याचे सांगून लाखो रुपए घेतले असल्याची माहिती पोलिसांना दिली.
आरोपी विवाहित असून ही तो शादी डॉट कॉम वरून मुलीना लग्नाचे आमिष दाखवून बारामती येथील रुई रुग्णालयाच्या शसकिय वसाहतीसह वेगवेगळया ठिकाणी शारिरीक संबंध प्रस्तापित करून १३ हजार रुपये घेऊन गंडा घातला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे,पोलिस कॉन्स्टेबल मंगेश कांबळे,दत्तात्रय मदने,चालक तुषार लोंढे यांनी ही कारवाई केली आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे अधिक तपास करीत आहेत.
.. ... ...........................
मुलींनी सोशल मीडियावरील लग्न स्थळावर मुलांकडून फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच आरोपी अजयकुमार चटौला याने आणखी कोणत्या मुलींची फसवणूक केली असल्यास बारामती तालुका पोलिसांशी संपर्क साधून होणाऱ्या फसवणुकीला बळी न पडता आताच सावधानता बाळगण्याचे आवाहन बारामती तालुका पोलिसांकडून करण्यात येत आहे.
COMMENTS