सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वर विद्यालय भाग शाळा करंजे विद्यालयात इ.९वी व इ.१०वी च्या १५ वर्षे पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण उस्फूर्तपणे पार पडले.
आज सोमेश्वर विद्यालय भाग शाळा करंजे विद्यालयात इ.९वी व १०वी च्या १५ वर्षे पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण उस्फूर्तपणे पार पडले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करंजे गावच्या सरपंच जया गायकवाड होत्या. तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी, डॉक्टर, नर्स, आशा सेविका, विद्यालयाचे प्रमुख श्री.साळुंके सर, विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व लसीकरणास पात्र असलेले विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातील एकुण ५० विद्यार्थ्यांनी कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला. शाळेच्या वतीने सर्व कोविड योद्धांचा यथोचित सत्कार करण्यात आला. मुलींनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अल्पोपाहाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित प्रमुख आरोग्य अधिकाऱ्यांनी शाळेच्या वतीने केलेल्या लसीकरण तयारीचे तोंड भरुन कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.माळशिकारे यांनी तर.कुचेकर यांनी आभार मानले.
COMMENTS