बारामती, दि.२२ :-
प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन समारंभ बुधवार, दि. 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9.15 वाजता बारामती येथील रेल्वे मैदानावर होणार आहे. वर्धापन दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते होणार असल्याचे तहसिलदार विजय पाटील यांनी कळविले आहे.
शासकीय ध्वजारोहण समारंभास शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी 10 मिनिटे अगोदर राष्ट्रीय पोषाखात उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.