सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोमेश्वरनगर मधील इ.10 ब मध्ये शिकणारे राज निकम व उमेश खंडागळे या मुलांना शाळेतून घरी जाताना रस्त्यावर एक मंगळसूत्र मिळाले. हे सापडलेले मंगळसूत्र या दोन्ही मुलांनी लगेंच ते विद्यालयातील जेष्ठ शिक्षक रणवरे बी बी यांजकडे आणून दिले. पोलिसांना याची माहिती दिली गेली.
मुलांच्या प्रामाणिक पणाचे कौतुक करण्यासाठी करंजे पोलीस स्टेशन चे पोलीस कॉ नितीन बोराडे व स्वप्नील काकडे हे प्रत्यक्ष विद्यालयात येऊन या मुलांचे कौतुक केले. सदरचे मंगळसूत्र हे सुषमा धनंजय नरुटे यांचे होते. पोलिसांनी सर्व खातर जमा करून ते त्यांच्याकडे संपूर्द केले.
मुलांच्या प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून करंजे पोलीस चौकी, जेष्ठ शिक्षक रणवरे बी बी, व सुषमा नरुटे यांनी प्रत्येकी 500 रु देऊन त्या मुलाचे कौतुक केले.
वरील दोन्ही मुलांचे प्रामाणिक पणाचे कौतुक सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप,व्हाईस चेअरमन आनंदकुमार होळकर, सचिव भारत खोमणे, प्रशालेचे प्राचार्य एस पी जगताप यांनी केले.