[उपजिल्हा रूग्णालाचा कामास लवकरच सुरूवात नवनवीन कामांचा सुचना ,विविध विकास कामांची पाहणी ]
सुपे प्रतिनिधी दि १३
बारामती तालुक्यातील सुपे याठिकाणी विविध विकास कामांच्या पाहीणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली, यावेळी सुपे गावात पुढील पंन्नास वर्षासाठीचा कामाचा नियोजन विकास आराखडा तयार होणार आहे असे उद्गार पवार यांनी काढले ,
सुपे येथे नव्याने उभारण्यात येत असणाऱ्या सुपे ग्रामीण रूग्णालयाची इमारतीची पाहणी करत लवकरच या रूग्णालयास सुरूवात करून जुनी ग्रामीणची इमारत पाडून नवीन मंजुर उपजिल्हा रूग्णालय इमारतीचा कामास एप्रिल महिन्यापर्यत सुरूवात करण्यात यावी अशा सुचना केल्या, तसेच बाधकाम साहित्याचा वापर चांगल्या प्रकारे करावा व नकली इलेट्रीक वायरिंग न वापरता आएसआय पध्दीतीचे साहीत्य वापरावे अशा अधिकाऱ्यांना सुचना केल्या ,
यावेळी सुपेत नव्याने सुरू असलेल्या पोलीस ठाणेच्या कामाची पाहणी व त्याची ऊंची अधिक वाढवावी या विषयी चर्चा करत अंतर्गत स्टाईल फरशी व साहित्य चांगल्या प्रकारचे असावे अशा सुचना संबंधित विभागाचा अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना दिल्या ,नियोजित जागेचा आराखडा पाहुन चर्चा केली अशा महत्वपुर्ण सुचना केल्या ,
तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार समिती जागेची पाहीणी करत याठिकाणचा अडचणीबाबत माहीती घेतली व यावेळी रस्ता लेवल नुसार सुरू असलेल्या बैठक ऑफीसचे काम असावे अशा सुचना केल्या ,तसेच सुपेत नव्याने उभारण्यात येत असलेल्या भव्य विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाचा कामाची व तेथील वाढीव जागा आणी फेरबदलाबाबतचा सुचनाही संबधित ठेकेदाराना दिल्या , तसेच सुपे मोरगाव रस्त्यावर साईट पट्टाचा रस्तावर येणाऱ्या मोठ्या खडीने होत असलेल्या अपघाताबाबर सार्वजनिक बाधकाम विभागाचा अधिकाऱ्यांना सक्तीचा सुचना केल्या ,
सुपे गावास यापुढील काळातील पंन्नास वर्षाचे नियोजीत काम करावयाचे आहे असे अजित पवार म्हणाले , तसेच गावाती विविध विकास कामांची संक्षिप्त माहिती राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष अनिल हिरवे यांनी दिली ,पवार सुमारे एक तासापेक्षा जास्त वेळ याठिकाणी असल्याने परिसरात त्याचे कामाचा चर्चेला उधान आले ,
याप्रसंगी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर , जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे , पं .स,सदस्या निता बारवकर ,मा.सभापती शौकत कोतवाल ,माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर बापु कौले,बारामती तालुका युवक उपाध्यक्ष अनिल हिरवे , राजकुमार लव्हे, प्रांतधिकारी दादासो कांबळे ,तहसिलदार विजय पाटील ,तालुका वैद्यकीय अधिकारी मनोज खोमणे , सपोनि सोमनाथ लांडे , ग्रामपंचायत सदस्य सह ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते ,