सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
केंजळ गावासह वाई शहरातील कायदा सुव्यवस्था आणी शांतता आबाधित राखण्यासाठी आणी कुठलाही अनुचित प्रकार घडविण्यासाठी कोणी प्रयत्न केल्यास त्यास चोख प्रत्युत्तर देण्यासाठी वाई विभागाच्या डिवायएसपी शितल खराडे जानवे यांच्या ऊपस्थितीत आज दि.१३ रोजी केंजळ गावासह वाई शहरातुन वाई भुईंज पाचगणी मेढा खंडाळा शिरवळ लोणंद वाठार आणी सातारा येथील दंगा नियंत्रण तुकडीसह वरील ८ पोलिस ठाण्यातील पोलिस निरिक्षकांन सह त्यांच्या ठाण्यातील पोलिस कर्मचार्यांनी एकत्रीत येऊन भव्य संचलन केले .काल दि.१२
रोजी केंजळ ता.वाई गावात घटलेल्या अनुचित प्रकारा वरुन सरळ मार्गाने जिवन जगणार्या नागरीकांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी भयभीत न होता पोलिस यंत्रणा त्यांच्या मदतीला सदैव तत्पर आहे हे दाखवण्याच्या हेतुनेच हे भव्य संचलन करण्यात आल्याची माहिती डिवायएसपी शितल खराडे जानवे यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.कायदा हातात घेऊन कोणीतरी
नियमबाह्य उचापती करण्यास पुढे आल्यास अशांन वर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी या वेळी बोलताना दिला आहे ..
वाई तालुक्यातील केंजळ हे गाव शैक्षणिक दृष्ट्या प्रथम क्रमांकाचे गाव म्हणून या गावाची
वेगळी ओळख आहे या गावात गेल्या ७० वर्षा
पासून बहुसंख्य नागरीक ऊच्य शिक्षण घेऊन
राज्यात शासकीय निमशासकीय खात्यात ऊच्य पदापर्यत पोहचून गावाच्या नाव लौकिकात भर
टाकण्याचे काम केले आहे या गावाने पहिले आमदार म्हणून कै.दादासाहेब जगताप यांना
पाठवले तर दुसर्यांदा याच गावातील कै.विठ्ठलराव अण्णा जगताप यांना आमदार
म्हणून पाठवले आणी याच गावातील कै.मानसींगराव जगताप यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष पद भुषविले होते अशा अनेक ग्रामस्थांनी केंजळ गावाचे नाव राज्यात प्रतिष्ठेच्या शिखरावर नेवुन ठेवले हि बाब अभिमानास्पद असताना आज त्याच केंजळ गावाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त होऊन गावची शांतता धोक्यात आणल्याने ति आबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यांचे अधिकारी पोलिस कर्मचारी
आणी दंगा नियंत्रण तुकडी या सर्वांनी एकत्रीत येऊन संचलन करणे हि बाब दुर्दैवी आहे . वास्तविक पाहता जुन्या जाणत्या लोकांच्या कर्तृत्वा मुळे गावाचा नावलौकिक वाढला अशांच्या पावलावर पाऊल ठेवून गावाचा नावलौकिक कसा वाढेल या साठी येथील तरुणांची शक्ती कामी यावी अशी अपेक्षा वाई तालुक्यातील जनतेने केली आहे