सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीत श्री मल्लिकार्जुन स्वाभिमानी गावकरी विकास पॅनेलने व श्री मल्लिकार्जुन विकास पॅनेलचा १३ विरूध्द शून्य असा पराभव करत विजय संपादन केला.
सोसायटी निवडणुकीत दोन्हीही पॅनेल मध्ये जोरदार लढत पाहायला मिळाली. दोन्हीही बाजूकडील प्रचार प्रमुख व उमेदवारांनी मागील आठ दिवसांपासून मतदारांना मतदान करण्याचे आव्हान केले होते. रविवार(दि.१३) रोजी सकाळ आठ पासून सायंकाळी पाचपर्यंत मतदारांनी उस्फूर्तपणे मतदान करत आपला मतदानाचा हक्क बजावला. ८१० मतदारांपैकी तब्बल ७७३ मतदारांनी मतदान केले.
निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टांकसाळे यांनी निवडणूक निकाल जाहीर केला. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व उपनिरीक्षक योगेश शेलार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
COMMENTS