सोमेश्वर कारखान्यावरील ऊसतोडणी कामगाराची झाडाला गळफास घेत आत्महत्या

सोमेश्वर रिपोर्टर live
2 minute read
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणी कामगाराने नीरा डाव्या कालव्या शेजारील झाडाला धोतराचा साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. 
         आत्माराम दगडू येवले वय ५५ रा. येवलवाडी ता शिरूर कासार जि बीड असे आत्महत्या केलेल्या ऊसतोडणी कामगाराचे नाव आहे. त्यांच्या पश्चात मुलगा व सून असा परिवार आहे. पत्नी वारल्यानंतर गेले चार पाच वर्षापासून येवले हे वैफल्यग्रस्त असल्याचे इतर ऊसतोडणी कामगारांनी सांगितले. 
To Top