वाई ! कवठेत एलसीबी पथकाच्या छाप्यात ४ दुचाकीसह ८९ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त : १२ जणांना अटक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी 
कवठे ता.वाई येथे सातारा  एलसीबीच्या पथकाने सापळा रचून गेली  कित्येक वर्षां पासून राजरोस पणे  येथे  सुरु असलेल्या ३ पानी खेळत असलेल्या  जुगार अड्यावर छापा टाकुन केलेल्या धाडसी कारवाईत ४ दुचाकी
सह तालुक्यातील १२ आरोपी गजाआड करुन  त्यांच्या कडुन तब्बल रोख रकमेसह ८९४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन त्यांच्या वर भुईंज  पोलिस ठाण्यात कॉस्टेबल सचिन ससाणे यांनी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केल्याने  गावासह वाई तालुक्यात खळबळ ऊडाली आहे .एलसीबीच्या या पथकाने केलेल्या कारवाईचे सर्व थरातुन कौतुक होत आहे .एलसीबीचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिलेली माहिती अशी की  थोर स्वातंत्र्य सेनानी कै.किसनवीर आबांचे वाई    तालुक्यातील कवठे हे गाव  राजकीयदृष्ट्या जागृत असणारे गाव म्हणून राज्यभर ओळखले जाते अशा नाव लौकिक प्राप्त असलेल्या गावाच्या प्रवेशदारा जवळ असणार्या कमाणी जवळच्या घरात गेली कित्येक वर्षांपासून ३ पानी जुगाराचा अड्डा हा  घरमालक स्वताच्या फायद्या साठी चालवत असल्याची माहिती खास खबर्या मार्फत मिळाली याची शहानिशा करण्या साठी सातारा  एलसीबी कार्यालयातुन एक पथक पाठविण्यात आले होते येथील जुगार अड्यावर नुसते कवठे गावातीलच  लोक जुगार खेळतात असे नाही तर गावाच्या पंचक्रोशीसह वाई तालुक्यातील अनेक गावातील नागरीक मोठ्या संख्येने या जुगार अड्यावर जुगार खेळण्या साठी येतात अशी माहिती चोकशी करण्या साठी आलेल्या या पथकाला मिळाली हा माहितीचा अहवाल पथकाने किशोर धुमाळ यांना सादर केला हा अहवाल प्राप्त होताच त्यांनी पोलिस नाईक मोहन पवार कॉस्टेबल सचिन ससाणे विशाल पवार रोहित निकम पृथ्वीराज जाधव यांना बोलावून त्यांचे पथक तयार करुन कवठे ता.वाई येथे सापळा रचून छापा टाकण्याचे आदेश दिले होते .
              हे  पथक  दि.४ रोजी दिवसभर वेषांतर करुन  सापळा लावुन बसले होते सायंकाळी या जुगार अड्यावर अचानक  छापा टाकुन धरपकड सुरु  असतानाच खेळणार्याची पळापळ सुरु झाली 
अनेक जण वाट मिळेल त्या दिशेने पळत असताना या पथकातील पोलिसांनी सिनेस्टाईल चित्यथरारक पाठलाग करुन या १२ आरोपींच्या अखेर मुसक्या आवळण्यास यश मिळविले.त्यांच्या कडून ४ दुचाकी जुगाराचे साहीत्यासह रोख रक्कम असा ८९ हजार ४४० रुपयांचा मुद्दे माल जप्त करुन त्यांना भुईंज पोलिस ठाण्यात आणुन त्यांच्या विरोधात एलसीबीचे कॉस्टेबल सचिन ससाणे यांनी तक्रार दाखल केल्याने वाई तालुक्यात खळबळ ऊडाली आहे .पण एलसीबीच्या या धाडसी कामगिरीचे वाई तालुक्याच्या सर्व थरातुन कौतुक होत आहे .
To Top