सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
मोरगाव : प्रतिनिधी
मोरगाव ता . बारामती येथील श्री मोरया विकास सोसायटी पंचवार्षीक निवडणूक आज संपन्न झाली . यामध्ये १३ जागा बिनविरोध झाल्या.यापैकी माजी सरपंच पोपट तावरे यांच्या श्री गणेश मयुरेश्वर सर्वधर्म विकास पॅनलचे ९ उमेदवार आहेत .
बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध विकास कार्यकारी सोसायटीचे बिगुल वाजले असून गावोगावी निवडणूक कार्यक्रम सुरु झाला आहे .अनेक गावातील शेतकऱ्यांनी अभी नही तो कभी नही भूमिका घेतली आहे . मोरगाव येथील श्री मोरया विविध कार्यकारी सेवा संस्थाची निवडणूक प्रक्रीया आज संपन्न झाली .येथील सर्व जागा बिनविरोध करून तालुक्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे . बिनविरोध झालेल्या जागेपैकी सर्वसाधारण गटातून सुनील दत्तात्रय तावरे , संजय प्रभाकर तावरे , गोरख दिनकर सणस ,चंद्रकांत हरीदास नेवसे ,सुशिल सिद्राम तावरे , नितीन पोपट तावरे , पोपट काशीनाथ तावरे ,पोपट श्रीमंत ढोले यांची बिनविरोध निवड झाली .
तर इतरमागास प्रवर्गातुन नवनाथ रामचंद्र नेवसे , भटक्या विमुक्त जाती जमातीतून एकनाथ विठोबा थोरात , अनुसूचित जाती जमातीतुन शिवदास दिगांबर गायकवाड , महीला प्रतीनिधीतुन मनिषा बाबा पालवे व मंदाकिनी मारुती तावरे यांची बिनविरोध निवड झाली . यासर्व उमेदवारांनी निवडीनंतर बोलताना सांगितले की , संचालक मंडळाकडुन शेतकऱ्यांच्या हिताचे अधीकाधीक निर्णय घेणार आहे .