सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद - निरा रोडवर रेल्वे उड्डान पुलावर टेम्पोने पाठीमागुन धडक दिल्याने मोटरसायकल स्वार जागीच ठार
लोणंद पोलीस स्टेशन मधुन मिळालेली अधिक माहिती अशी की, लोणंद - निरा रोडवर रेल्वे उड्डान पुलावर आज सायंकाळी पाऊने सहाचे सुमारास माळसिरस येथुन रोहाकडे मोटारसायकल क्र. MH 0 6 - CA - 0948 वरून निघालेल्या हर्षल प्रधान रा. रोहा जि. रायगड याला टेम्पो क्र.MH 18 - BG-6830 ने पाठीमागुन धडक देऊन झालेल्या अपघातात हर्षल प्रधान जागीच ठार झाला. .त्याच्या बरोबर असलेल्या दुसऱ्या मोटारसायकलस्वारामुळे अपघाताची माहिती समजताच लोणंद पोलीस त्वरीत घटनास्थळी दाखल झाले.अपघातानंतर पळून गेलेल्या टेम्पोला पुढे अडऊन ताब्यात घेण्यात आले आहे.
लोणंद पोलीसांनी अपघात ग्रस्त वाहन बाजुला करून वाहतुक सुरळीत केली . लोणंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद घेण्याचे काम सुरू होते.