सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील रस्त्यांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी कमी पडू देणार नसल्याचे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी व्यक्त केले.
करंजे ता बारामती येथे यशवंतराया मंदिर ते करंजे ओढा दरम्यान रस्त्याच्या भूमिपूजन शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतिश काकडे, सोमेश्वर चे संचालक राजवर्धन शिंदे, ऋषिकेश गायकवाड, गुलाबराव गायकवाड, दिग्विजय जगताप, शहाजी जगताप, कुमारभाऊ जगताप, कुणाल गायकवाड, तानाजी जगताप, दत्तात्रय जगताप, ठेकेदार संग्राम जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
या रस्त्याची लांबी १३०० मीटर असून रुंदी साडेपाच मीटर आहे. १ कोटी ४९ लाख रुपयांचे हे काम आहे.