पुरंदर ! वीर येथे रंगला श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
परिंचे : प्रतिनिधी 
श्री क्षेत्र वीर (ता.पुरंदर) येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व देवी जोगेश्वरी यांचा शाही लग्न सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी व मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पंधरा दिवस चालणाऱ्या वीर यात्रा उत्सवाची सुरुवात देवाच्या लग्नाने करण्यात आली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले. 

               मानाच्या कोडीत (ता.पुरंदर) येथील पालखीने मंगळवारी (दि.१५) रोजी संध्याकाळी राऊतवाडी येथे हळदीचा मान स्विकारला संध्याकाळी सात वाजता श्री क्षेत्र वीर येथील वेशीवर पालखीचे आगमन झाले त्यावेळी वीर मंडळींच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. देऊळवाड्याच्या दक्षिण दरवाजाने सर्व मानाच्या काठ्या आणि कोडीतची पालखी देऊळवाड्यात गेली दोन मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर रात्री बाराच्या दरम्यान मानकरी राऊत मंडळींनी देवाला पोशाख, मंडवळ्या, बाशिंग, अलंकार करून एक वाजता ' सवाई सर्जाचा ' जयघोष करत सर्व देवांना लग्नासाठी आमंत्रित करण्यात आले.

    रात्री दिड वाजता कोडीत बरोबर राजेवाडी,भोडवेवाडी, सोनवडी, पुणे (कसबा पेठ) ,कनेरी, सुपे, आदी पालख्या व वस्र परिधान केलेल्या मानाच्या काठ्या दक्षिण दरवाजाने बाहेर जाऊन अंधारचिंच येथे दाखल झाल्या त्या ठिकाणी कण्हेरी व वाई या काठ्यांची पारंपरिक भेट झाली देवाचे मानकरी शिंगाडे,तरडे,बुरंगुले ,ढवाण, व्हटकर यांना फुलांच्या माळा घालून मानपान करण्यात आले. रात्री दोन वाजता सर्व पालख्या व काठ्या देऊळवाड्यात दाखल झाल्या प्रथेप्रमाणे सर्व काठ्या व पाल्याची मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर मोजके मानकरी, विश्वस्त, भाविकांच्या उपस्थितीत गुरव पुजाऱ्यांनी देवाच्या उत्सव मूर्तींना अलंकार व पोशाखानी सजवले होते.

            गुरव समाजाचा वतीने अक्षदा वाटप केल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजता ग्राम पुरोहित मंत्रोच्चार सुरू करून गावचे मुकादम पाटील चंद्रकांत ज्ञानोबा धुमाळ यांच्या हस्ते श्री नाथ मस्कोबा महाराज व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा पार पडला. काठ्या व पालकांची मंदिर प्रदर्शन होऊन  हा सर्व लवाजमा देववाड्यातून भक्त कमळाजी व तुकाई देवीच्या भेटी साठी मार्गस्थ झाला. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात आली अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सचिव अभिजीत धुमाळ यांनी दिली.यात्रा दरम्यानच्या काळात मंदिर परिसर स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वयंसेवक,सिसिटीव्ही आदी व्यवस्था पुरवण्यात आली असल्याचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.
To Top