सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मु सा काकडे महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रा.डॉ नारायण राजूरवार यांची महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या करीयर कट्टा या उपक्रमाच्या पुणे जिल्हा ग्रामीण समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत कमी खर्चात स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावे यासाठी करीयर कट्टा हा उपक्रम सुरू केला आहे.या निवडीबद्दल महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिश काकडे, संस्थेचे सचिव प्रा. जयवंतराव घोरपडे , सहसचिव सतिश लकडे महाविद्यालयाचे प्रा. डॉ देविदास वायदंडे ,उपप्राचार्य डॉ प्रविण ताटे देशमुख, डॉ जे .एम.साळवे , डॉ जे.जे.कदम, प्रा आर.डी गायकवाड आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.