बारामती पश्चिम ! काकडे महाविद्यालय ठरतेय पोलीस भरतीचे केंद्र : तब्बल एवढे विद्यार्थी झाले महाराष्ट्र पोलीसात रुजू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------   
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या पोलीस भरती व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणातून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्यामुळे, महाविद्यालय व्यवस्थापन समितीने संबंधित यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करून त्यांचा गौरव करण्यात आला. या केंद्रामार्फत चालवलेल्या प्रशिक्षणातून नऊ विद्यार्थ्यांची निवड महाराष्ट्र पोलीस दलाच्या विविध जिल्ह्यात झाली आहे. या प्रसंगी महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा, व गुणवंत विद्यार्थी निर्माण व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी व्यवस्थापन समितीचे सचिव प्रा. जयवंतराव घोरपडे, प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे, सहसचिव सतीशराव लकडे उपस्थित होते.
    महाराष्ट्र पोलीस दलात महाविद्यालयातील निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे
१) होळकर अजय संजय- रायगड शहर
२) इंगळे केतन बाळासो- रायगड शहर 
३) पोटे अजित हरिभाऊ- मुंबई शहर
४) पवार किरण अरुण- नवी मुंबई शहर
५) होळकर अक्षय दत्तात्रेय- राज्य राखीव पोलीस दल गट क्र. ५
६) टकले शिवाजी बबन- राज्य राखीव पोलीस दल गट क्र.७
७) होळकर ओंकार बाबासो- पुणे शहर
८) होळकर सागर- पुणे शहर
९) गडदरे शरद बबन- इंडियन आर्मी.
     तसेच महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात काम करणाऱ्या प्रा. शिल्पा कांबळे व मराठी विभागातील प्रा. नीलिमा देवकाते यांनी सेट परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
  यावेळी व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
  या केंद्रामार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध विषयांचे मार्गदर्शन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब मरगजे व केंद्राचे समन्वयक प्रा. दत्तराज जगताप यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा मार्गदर्शन प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी केले.
To Top