बारामती दि ८
बारामती तालुका ग्राहक पंचायत तर्फे रथसप्तमी व राष्ट्रीय प्रवासी दिन मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी ग्राहक पंचायत बारामती तालुका निर्मित दिनदर्शिकेचे प्रकाशन बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, बारामती विभागीय परिवहन अधिकारी पाटील, उपविभागीय परिवहन अधिकारी केसकर, बारामती रेल्वे विभाग प्रमुख पाटील आणि ग्राहक पंचायत सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी रेल्वेचे वाहक मोटरमन यांचा फेटा, हार घालून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास ग्राहक पंचायत बारामती तालुक्याचे डॉ. नवनाथ मलगुंडे, प्रा. रवींद्र टिळेकर, शेखर हुलगे, तानाजी गोफणे , संतोष जगताप, ऋषिकेश माकर, गणेश लोखंडे, तसेच पत्रकार घनशाम केळकर व स्वप्निल कांबळे उपस्थित होते.