भोर ! हिरडस मावळचे पालकत्व आहे होते आणि रहाणार : रणजीत शिवतरे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यातील हिरडस मावळ खोऱ्यात झालेली विकास कामे ही खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झाली आहेत.जनतेने सुचवलेली बहुतांशी कामे पूर्ण केली आहेत.गावातुन किती मतदान झाले हे कधीही न पाहता प्रत्येक गावात जास्तीत जास्त विकास कामे करण्याचा प्रयत्न नेहमी केला आहे. तसेच उर्वरित विकास कामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मार्गी लावणार असून स्व.अविनाश भेलके यांच्या नंतर हिरडस मावळची जबाबदारी माझीच आहे.त्यामुळे आगामी काळात निवडणुकीसाठी उमेदवार कोण आहे हे न पाहता निवडणुकीत पक्ष देईल त्या उमेदवारीच्या पाठीमागे खंबीर उभे रहा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी हिरडस मावळ खोऱ्यातील विविध विकास कामांच्या उद्घाटन व भूमीपूजन प्रसंगी केले.                                    शिवतरे पुढे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसने अतिवृष्टी काळात दरडी काढण्यासाठी,शिरगाव येथील वाहुन गेलेली मोरी दुरूस्ती व नुकसान झालेल्या शेती, तालींना जास्तीचा नुकसान मोबदला मिळवा व शासकिय तसेच वेगवेगळ्या संस्थांमार्फत अन्नधान्य किट तसेच कोविड काळात लसिकरणासह आरोग्यसेवा मिळण्यासाठी मोठा प्रयत्न केला आहे.यावेळी मावळातील कुडली बुद्रुक,मानट वस्ती, दुर्गाडी,अभेपुरी,चौधरीवाडी,शिळिंब,कुंड राजीवडी,आशिंपी ,उंबर्डे,शिरगाव या गावातील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन  शिवतरे यांच्या हस्ते करण्यात आले.
          याप्रसंगी ज्ञानोबा धामुनसे,पांडुरंग गोरे, जगन्नाथ पारठे,संदिप खाटपे, मनोज खोपडे,सुहित जाधव,केतन चव्हाण,विठ्ठल धामुनसे, नंदकुमार सोहणी, देवा म्हसुरकर,निलेश पोळ,मारुती डेरे,नाना कोंढाळकर,अंकुश कंक,नितीन कुडले, जितेंद्र लेकावळे,अनिकेत कोंढाळकर यांच्यासह परिसरातील सरपंच उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
To Top