सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
पाचवड कुडाळ रस्त्यावरील अमृतवाडी गावच्या हद्दीतून भरघाव वेगात जाणार्या ट्रँक्टरच्या पाठी मागील दोन नंबरची ट्रॉली ही नागमोडी वळणे घेत जात असताना तिचा दणका जवळुन जाणार्या दुचाकीला जोराचा बसल्याने दुचाकी वरील दोघेही डांबर रस्त्यावर कोसळले त्या वेळी दोघांचा मोठ्या प्रमाणात
रक्तस्राव झाल्याने त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसर्या जखमीला तातडीने ऊपचारा साठी पुणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती
भुंईज पोलिसांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली ..
सविस्तर वृत्त असे कि दि .८ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर क्र.एम.एच.
११सी.जी.२४४९ हा दोन ट्रॉल्या जोडून पाचवड बाजु कडुन भरघाव वेगात कुडाळ बाजूकडे जात असताना तो अमृतवाडी ता.वाई गावच्या हद्दीत सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आला त्या वेळी समोरुन कुडाळ बाजू
कडुन एम.पी.४७ एम.के.७४९८ या क्रमांकाच्या दुचाकी वरुन संतोष कालुरामजी बारेला वय २६ राहणार गुरानाणी जिल्हा सिहोद (मध्यप्रदेश) व त्याचा साथीदार नाव समजले नाही असे दोघेजण वाई बाजु कडे जात असताना ट्रँक्टरच्या पाठी मागील दोन नंबरची
ट्रॉली नागमोडी वळणे घेत जात असताना तिचा दणका दुचाकी स्वारांना बसल्याने ते गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळले .मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला.
या अपघाताची माहिती भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष कांबळे यांना समजताच त्यांनी हवलदार जी.एस.बोरसे.चंद्रकांत मुंगसे.पी.डी.शिंदे.कॉस्टेबल रविंद्र वर्णेकर .अमोल बागल.सोमनाथ बल्लाळ.या पोलिस पथकाला तातडीने अपघात स्थळावर पाठवले पोलिसांनी तात्काळ जखमी तरूणांना
रुग्ण वाहिकेतुन सातारा येथील शासकीय रुग्णालयात पाठवले पण तेथील ऊपस्थित डॉक्टरांनी संतोष कालुरामजी बारेला या तरुणाला मृत घोषित केले .अपघात ग्रस्त ट्रॅक्टर दोन ड्रॉल्या आणी त्या वरील चालक यांना ताब्यात घेवुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.या भिषण अपघाताचा पुढील तपास सपोनि आशिष कांबळे हे करीत आहेत ..