सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
वाई : प्रतिनिधी
वाई शेती उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्ड वर नवीन हळदीची आवक सुरू झाली आहे. हळदीचे लिलावाचा शुभारंभ सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितिन (काका) पाटील यांच्या शुभहस्ते झाला. हळदीचा उच्चांकी दर प्रति क्विंटल 12 हजार रूपये इतका मदनशेठ ओसवाल यांच्या आडत काटयावर देण्यात आला.
आज 1697 पोती नवीन हळदीची आवक झाली. हळदीचा दर प्रति क्विंटल 8 हजार ते 12 हजार इतका देण्यात आला. याप्रसंगी प्रमोददादा शिंदे, राजेंद्र भोसले, नितीन मांढरे, यशवंत जमदाडे, अरविंदशेट कुदळे, मोहन चव्हाण,विक्रम वाघ,सुधीर गायकवाड,नितीन वाघ, शिवाजीराव गुळदगड, अशोक भोसले,रामदास इथापे,नरेंद्र बाबर, संदिप खोपडे,बाळासाहेब शिंदे,दिलीप पिसाळ,रमेश पिसाळ,कुंडलिक घाटे,निखिल सोनावणे,सुरेश पिसाळ व वाई तालुक्यातील हळद उत्पादक शेतकरी व प्रमुख कार्येकते उपस्थित होते.
बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ, उपसभापती दिपक बाबर, माजी सभापती मोहनराव जाधव, संचालक विक्रमसिंह पिसाळ, विजयकुमार मांढरे, कुमार जगताप, राजेंद्र सोनावणे, दत्तात्रय पोळ, अंकुश कुंभार, दत्तात्रय भणगे, प्रकाश साळुखे, हणमंत चव्हाण, दत्तात्रय जमदाडे, हारूणभाई बागवान, गणेश बनसोडे,सौ.शारदा गायकवाड,सौ.बबई लोळे, नामदेव हिरवे तसेच व्यापारी मोहनशेठ ओसवाल, कांतीलाल ओसवाल, हिराशेठ जैन, मिठालाल जैन,कांतीलाल भुरमल,शंकर शेठ, मदनलाल ओसवाल, प्रविण ओसवाल,कन्हैया गांधी,विनोद पावशे,शंकर जाधव,सचिन जेधे, रवी कोरडे, मधुकर गाडे, हाफीजउददीन मुजावर तसेच हिराशेट जैन व रवी कोरडे यांनी व्यापा-यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.
तसेच विक्रम वाघ यांनी शेतक-यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले सर्व शेतकरी,हमाल, खरेदीदार, बाजार समितीचे प्र.सचिव राजेंद्र क्षिरसागर व सर्व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ व उपसभापती दिपक बाबर यानी स्वागत केले. बाजार समितीचे माजी सभापती मोहन जाधव यांनी कार्यक्षेत्रातील सर्व शेतक-यांना आवाहन केले आहे की शेतक-यांनी आपला हळद हा शेतमाल निवडून स्वच्छ करून वाळवून मार्केट यार्ड वर लिलावासाठी आणावा. मार्केटच्या आवाराच्या बाहेर शेतक-यांची वजनात व पेमेंटमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या तक्रारी यापूर्वी बाजार समितीकडे आलेल्या आहेत. त्यामुळे आवाराबाहेर शेतक-यांनी माल घालू नये. व नवीन हळदीची विक्री करताना ग्रेडींग करून व हळद 50 किलो पोत्यामध्ये आणावी. (हळद शेंग,गाठ,कोचा,कणी)मार्केटवर त्याची विक्री करावी. सर्व आडत व्यापारी यांना नियमितपणे लिलाव काढणे बाबत सूचना देण्यात आल्या असून शेतकरी पेमेंट वेळेवर करणेत बाबत सूचना देण्यात आल्या आहेत.