सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
वेळे ता.वाई गावात गेल्या एक महिन्या पासुन काढणीच्या उंबरठ्यावर ऊभे असलेल्या ज्वारींच्या पिकात घुसून रानडुकरांच्या कळपांनी धुमाकुळ घालुन पिक आडवे पाडून
त्याची कणसे खाण्याचा सपाटा सुरू केल्याने शेतकर्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकर्यांन मध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
याची शासना कडून नुकसान भरपाई मिळावी
अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकर्यांनी केली आहे .
सविस्तर माहिती अशी की वेळे ता.वाई हे गाव दुष्काळ ग्रस्त गाव म्हणून ओळखले जाते या गावातील शेती ही पडणार्या पावसाच्या पाण्या वर अवलंबून असते पण गेल्या दोन वर्षां पासून बाराही महिने पाऊस पडत असल्याने येथील शेतकर्यांन मध्ये समाधानाचे वातावरण पसरले
होते येथील शेतकरी हा जिद्दी कष्टाळु असल्याने ज्वारी या जातीचे नव नवीन महांगडे बियाणे खरेदी करुन पेरण्या करुन स्पर्धात्मक पिके घेण्यासाठी या गावात चढाओढ लागते ज्वारीचे जास्तीजास्त उत्पादन घेण्यासाठी येथील शेतकर्यांचा कल असतो शेणखत व रासायनिक
महागडी खते वापरुन पिके वाढवली जातात
पुढे ज्वारीचे पीक हुरड्यात आल्या पासुन रानपाखरांनी कणसातुन ज्वारीचे दाने खाऊ नयेत म्हणून प्रत्येक शेतकरी पहाटे पासुन त्याची दिवस भर राखण करत असतो वेळे गावातील ज्वारीची पिके जोमात असतानाच
या गावाला डोंगर जवळ असल्याने येथील शिवारात नेहमीच वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असतो या प्राण्यांनी पाळीव जनावरांनवर हल्ले करुन शेतर्यांचे हजारो रुपयांचे नुकसान केलेच्या नोंदी आढळून येतात .
वेळे गावातील शेतकर्यांनी या वर्षी १८२ एकरात ज्वारीच्या पिकाची पेरणी करुन पिकेही जोमात आणली त्या पैकी आज अखेर १२ एकर ज्वारीच्या उभ्या पिकांन वर राणडुकरांच्या कळपाने पिके आडवी करुन येथील शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याने शेतकर्यांन मध्ये संतापाची लाट उसळली आहे ..