भोर-वेल्हा-मुळशीच्या अतिवृष्टीतील दुरूस्तीसाठी १६ कोटी ४६ लक्ष निधी मंजूर : आ. संग्राम थोपटे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
 भोर विधानसभा मतदार संघाचे संग्राम थोपटे यांच्या विशेष प्रयत्नातून २०२१-२२ च्या अतिवृष्टीतील दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत १६ कोटी ४६ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.लवकरच रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू करून पूर्ण करण्यात येणार आहेत.                  यंदाच्या पावसाळ्यात भोर-वेल्हा-मुळशी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती.या अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते,पूल वाहून गेले होते तर काही ठिकाणी रस्त्यांवर मोठं-मोठ्या दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे तालुक्यातील महत्वाचे रस्ते बंद झाले होते.परिणामी प्रवासी नागरिक,पर्यटक व वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.या पार्श्वभूमीवर आमदार थोपटे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्वरित काही दिवसात तातडीने उपाय योजना करून वाहतूक पूर्व पदावर येण्यासाठी संबधीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात अधिकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली होती.तर मोठ्या नुकसानीच्या पूल,संरक्षक भिंत व मोऱ्या यांच्या दुरुस्तीसाठी आमदार संग्रामदादा थोपटे यांनी त्वरीत विशेष प्रयत्न व पाठपुरावा करून निधी उपलब्ध केला आहे.लवकरच रस्ते दुरुस्तीची कामे सुरू होणार असल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले.

To Top