सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
वारकरी सांप्रदयामुळे मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल होत असतात.सांप्रदाय जपण्यासाठी समजाने पुढे येणे गरजेचे आहे.सांप्रदयाच्या माध्यमातून मानवाचे जीवन सफल होत असल्याने वारकरी सांप्रदाय जीवनाचा आत्मा आहे असे प्रतिपादन अॅड .जयश्री शिंदे यांनी केले.
भोर येथे वैकुंठवाशी रामनाना सोनवणे यांच्या समरणार्थ प्रेरणा प्रतिष्ठान तर्फे रायरेश्वर जेष्ठ वारकरी प्रतिष्ठान यांच्या सदस्यांना प्रवाशी बॅग व निसर्ग वाचवाचा संदेश देणाऱ्या कापडी बॅग वाटप कार्यक्रमात सोमवार दि-७ ऍड.शिंदे बोलत होत्या.कार्यक्रम प्रसंगी ५० वारकरी महिला व पुरुष यांना बॅग वाटप केले.यावेळी वारकरी प्रतिष्ठानचे संस्थापक प्रदीप शिनगारे,अध्यक्ष शंकर गुरव,जेष्ठ वारकरी पांडुरंग कुमकर,दगडू दामगुडे,बाबुराव गोरे,विष्णुबुवा बांदल,सामाजिक कार्यकर्ते राजकुमार शिंदे,प्रमोद सोनवणे आदींसह वारकरी सांप्रदयातील सदस्य उपस्थित होते.