शब्बास रे पट्ट्या.....! वडगाव निंबाळकरचा शिवबाचा मावळा धावला २५ किलोमीटर

Pune Reporter
 

          
वडगाव निंबाळकर दि १९
 सुनिल जाधव  

 बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे दरवर्षी प्रमाणे यंदा ही शिवजयंती उत्सव मोठया आनंदात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे वेगळे गड-किल्ल्यावर ज्योत आणण्यासाठी शिवभक्त जात असतात. यंदा विशेष भाग म्हणजे आर्मी भरती करणार अथर्व सचिन कदम या मावळ्याने सलग 25 किलोमीटर हातात ज्योत घेऊन धावण्याचा विक्रम केला आहे. वडगाव निंबाळकर येथे श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे ( भगवा चौक ) येथे सामाजिक बांधिलकी जपून पारंपरिक  हलगी वाद्य, सांस्कृतिक कार्यक्रम याचे आयोजन करण्यात आले. सर्व वाड्या-वस्त्या वरील लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम सोहळा उत्साहात साजरा करत असतात. यंदाच्या वर्षी हा शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
To Top