बारामती येथे संत नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी

Pune Reporter
सोमेश्वर रिपोर्टर टिम
बारामती दि १९
    बारामती सोनार समाज सेवा संघाच्या वतीने संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली .
     येथील जुना  मोरगाव रोड येथे संत नरहरी महाराजांचे भव्य मंदीर बांधणेत आले आहे नुकतीच नरहरी महाराज ,विठ्ठल रुक्मीणी ,शिवलींग आदी मुर्ती बसवुन प्राणप्रतिष्ठा करणेत आली आहे .
      आज सिद्धिविनायक फाउंडेशन चे अध्यक्ष गणेश जोजारे बारामती शहर राष्ट्रवादी उपाध्यक्षा वर्षा जोजारे या उभयतांच्या हस्ते महापुजा करणेत आली. त्यानंतर नरहरी महाराज पादुकाची पालखी काशीविश्वेश्वर मंदीरातुन आणणेत आली. अनेक समाज बांधवानी नरहरी महाराज जयंती निमित्त या पालखी सोहळ्यात भाग घेतला . 
त्यानंतर वारकरी सेवा संघ ,बारामती तालुका  संघटक प्ह.भ.प. श्री.प्रविण महाराज चव्हाण  यांचे प्रवचन झाले.,यावेळी वारकरी सेवा संघ पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बारवकर ,पंढरपूर  विठ्ठल रुक्मिणी मंदीराच्या विश्वस्त  अँड .माधवीताई निगडे जिल्हा अध्यक्ष -बाळासाहेब बारवकर  श्री.किरण कामठे , श्री. दत्तात्रय गावडे , दत्तात्रय भोसले ,श्री. जगन्नाथ जगताप ,-श्री.प्रशांत काटे ,श्री.अरविंद तावरे , लालासौ आटोळे ,.श्री. राजेंद्रदादा सोळस्कर ,आदी वारकरी सेवा संघाचे सदस्य हजर होते . 
     बारामती सराफ असोसिएशन अध्यक्ष किरण आळंदीकर ,सोनार समाज सेवा संघ अध्यक्ष रघुनाथ बागडे ,सुधीर पोतदार, प्रभाकर धर्माधिकारी ,जोतीराम पंडीत ,सुधाकर उदावंत ,अनिल लोळगे ,ए बी होनमाने ,चंद्रकांत  माळवे,श्रीकृष्ण क्षीरसागर,संतोष बागडे  आदी जेष्ठांच्या हस्ते वारकरी सेवा संघ याना १५ संतांच्या मोठ्या  प्रतीमा देण्यात आल्या .महाप्रसाद जोजारे सराफ यांचे वतीने देण्यात आला या प्रसंगी बारामती च्या माजी नगराध्यक्षा जयश्री सातव ,नगरसेविका सुहासिनी सातव ,महिला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वनिता बनकर ई मान्यवर हजर होते .आज नरहरी महाराज यांची ७३६ वी पुण्यतिथी व शिवजयंती उत्सव या मंदीरात पार पडला .
To Top