बारामती ! सोमेश्वरनगर मध्ये SPL चा हंगामा : शेवटचा खेळाडू एक हजार रुपयांना तर 'या' खेळाडुची लागली सर्वात जास्त बोली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर प्रीमियर लीग 2022 मध्ये यामधील सहभागी सोमेश्वरनगर परिसरातील खेळाडूंचा लिलाव आज  करंजे ता बारामती याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये चारही संघमालक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
प्रत्येक संघमालकांनी चढाओढीने खेळाडूंची खरेदी केली. यामध्ये सर्वात कमी एक हजाराची बोली लावण्यात आली तर करंजेपुलच्या नवाझ शेख ची १५ हजार ५०० रुपये बोली लावून पापा फायटर संघाने खरेदी केले. 

संघ व संघमालक
१) पापा फायटर्स- पापा मुलानी
२) डिएस पॅंथर्स - दत्ता सोनवणे
३) किरण सुपर किंग्स -किरण  शेंडकर
४) राजेश इंडियन्स -राजेश भांडवलकर
यामध्ये सर्वात मोठी बोली 
नवाझ शेख १५५०० (करंजेपुल) राहुल होळकर १३५००(करंजे), लारा ढोणे १२३०० (चोपडज), गणेश भोसले १०५०० (वाणेवाडी),  उमेश गाडे ७५०० (चोपंडज), सोमेश कुंभार ७३०० (करंजे), भाऊसाहेब हुंबरे ७२०० (करंजे) राहुल क्षिरसागर ६९०० (करंजे), अनिकेत चौधरी ६५०० (चौधरवाडी) जितुभैय्या सकुंडे ५१०० (वाघळवाडी), विकास साळुंखे ५१०० (वाकी), शशिकांत जेधे ५००० (वाणेवाडी) अशा रीतीने सोमेश्वर परिसरातील खेळाडूंचा लिलाव आज पार पडला. यावेळी तब्बल दोन लाख रुपयांची उलाढाल झाली. 
To Top