सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : प्रतिनिधी
भोरला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे साध्या पद्धतीने नियमांचे पालन करून साजरा होणारा माघ पौर्णिमेनिमित्त वाघजाई देवीचा यात्रा उत्सव भाविक भक्तांनी यंदा मोठी गर्दी करीत आनंदात साजरा केला.
अनेक वर्षांपासून वाघजाई देवीचा माघ पौर्णिमेचा उत्सव मोठ्या दिमाखात शहरात काठी-पालखीची ग्रामप्रदक्षण काढून भाविक साजरी करीत असतात.मात्र मागील दोन वर्षे कोरोनामुळे यात्रा उत्सवावर बंदी असल्याने वाघजाई देवी मंदिरात उत्सव साजरा केला जात होता.यंदा कोरोना संसर्ग कमी झाल्याने उत्साहात भाविकांनी माघ पौर्णिमा उत्सव साजरा केला.देवस्थानच्या वतीने शासनाचे नियम पाळून पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांचा खेळ,काठी-पालखी समोर बैलगाडीची मिरवणूक काढण्यात आली होती.