सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
कोरोना काळात बंद असलेली विद्यालये आता कुठे तरी सुरु झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालयां मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिक्षकांसह विद्यार्थीही शिक्षण आणि अभ्यासक्रमा कडे मोठ्या काळजी पूर्वक पाहात आहेत. अशात प्रदीर्घ काळ पडलेला अभ्यासाचा खंड अधिकाधिक भरून काढण्यास विद्यार्थी भर देत आहेत. यात काही विद्यार्थी मात्र गुंड प्रवृत्तीची दहशत निर्माण करण्यात अडकले आहेत हे कृत्य विद्यार्थी दशेला शोभनीय आहे का...?.. असा प्रश्न पालकांमधून विचारला जात आहे
वाई तालुक्यातील गावांन मधील ऊनाडकी करणारे टोळके सध्या वाई येथील नामवंत विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे केंद्र असलेले किसनवीर महाविद्यालया सह प्रवेश द्वाराच्या परिसरात एक मेकांची डोकी फोडताना दिसत आहेत . त्या मुळे हे विद्यार्थी किसनवीरला कलंकित करुन गुन्हेगारी वर्तुळाकडे खेचले जात आहेत. अशा घटनामुळे विद्यार्थी,विद्यार्थीनी पालक आणि शैक्षणिक वर्तुळातही मोठ्या प्रमाणावर चींतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाई तालुक्यामध्ये नुकत्याच किसन वीर महाविद्यालयाच्या बाहेर दि १५ फेब्रुवारी झालेल्या मारामारीत चक्क डोक्यात दगड घालुन जीवघेणा हल्ला त्यामध्ये पियुष महंगडे, सुशांत मालुसरे, किरण खरात, गौरव शिर्के यांच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे चारही आरोपी फरार असल्यामुळे पोलिस पथक आरोपींचा शोध घेत आहे. असा जीवघेना हल्ला कुनच्या तरी जीवावर बेतू शकतो . असे प्रकार वारंवार घडू नयेत आणि घडले तर ह्याला जबाबदार कोण अशी मागणी जनतेतून होत आहे. वाई पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे साहेब यांनी धडाकेबाज कारवाई केल्या मूळे विद्यर्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ह्या रोज घडत असलेला भांडणाचा फड नक्की कोणाच्या जीवावर चालतो व त्याचे वस्ताद कोण आहेत असा प्रश्न पालकांना पडला आहे. ह्या कारवाई मुळे वाई पोलीस स्टेशन चे सर्वत्र कौतुक होत आहे. ह्या भांडणाला कुठे तरी पूर्ण विराम मिळावा ह्या साठी किसनवीर महाविद्यालयाच्या बाहेर C.C कॅमेरा लावावा अशी मागणी पालकांना कडून होत आहे. ही भांडणे अशीच चालु राहिली तर प्रत्येक गावामध्ये गाव गुंड तयार होतील अशी पालकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.