सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नसरापूर : प्रतिनिधी
इंग्रजी विषयाची गुणवत्ता वाढावी. श्रवण, भाषण, वाचन, लेखन व संभाषण या कौशल्याचा विकास व्हावा म्हणून पाठ्यक्रमातील कविता, कथा, wh प्रश्न, नाट्यीकरण, शब्द संपत्ती यांचा सराव व्हावा म्हणून कालबद्ध स्पर्धात्मक इंग्रजी अध्ययन समृद्धी उपक्रम सुरू केला आहे ,असे प्रतिपादन भोर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे- केळकर यांनी केले.
भोर पंचायत समिती विकास गटातील केंद्र स्तरावर इंग्रजी अध्ययन स्पर्धा संपन्न झाल्या. त्या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी गटशिक्षणाधिकारी सोनवणे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की,स्पर्धेचे स्वरूपाप्रमाणे विद्यार्थी व शिक्षक याबाबत जास्त तयारी करतील. विद्यार्थ्यांचा सराव करून घेतील. इंग्रजी अध्ययन बाबत भोर मध्ये अधिक यश मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये अधिकाधिक सहभाग नोंदवत स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाल्या असे प्रतिपादन केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे- कदम यांनी केले .
इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून केंद्रप्रमुख व पुणे जिल्हा केंद्र संघटनेच्या कार्याध्यक्षा प्रभावती कोठावळे -कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर परीक्षेची व स्पर्धेची तयारी नियोजन पदवीधर शिक्षक दत्तात्रय पांगारे, प्रशांत भारती आणि दिपाली गाडे यांनी पाहिले. सुरेखा मोकाशे, गायकवाड वनिता, रूपाली सरपाले, साळवे रामदास, देसले चित्रलेखा , विष्णू बाठे,राजेशिर्के माधुरी, गोळे सचिन, निगडे ज्योती ,धावले पंढरीनाथ, चिकने नारायण संदीप जगताप, पंडित अर्चना, बडे विद्यादेवी, राऊत रजनी, पवार शशिकांत ,वैशाली गोळे आदी उपस्थित होते.
----------------------
आयुष प्रसाद (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांच्या प्रेरणेने व डॉ. अनिल गुंजाळ
(शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद पुणे प्राथमिक) डॉ. शोभा खंदारे प्राचार्या, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) पुणे) यांचे मार्गदर्शनाखाली भोर पंचायत समिती शिक्षण विभाग विकास गटातील केंद्रस्तरावर इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.