सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीत सदस्य पदाच्या २ जागा रिक्त होत्या. त्या रिक्त जांगावर सदस्यांची निवड करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक ७५१ अनुसार ठराव घेण्यात आला होता.त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने कार्यवाही करत रिक्त झालेल्या दोन जागांवर जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य भोरचे विद्यमान सभापती लहूनाना शेलार व खेडचे सभापती अरुण चौधरी यांची निवड करण्यात आली. त्याचे पत्र जिल्हा परिषदेचे सचिव व अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागास दिले आहे.शेलार यांनी सदस्यपदी निवड झाल्याने तालुक्यातून अभिनंदन होत आहे.