सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जेजुरी : प्रतिनिधी
भारतमाता ज्ञानपीठ वीटा , जि.सांगली यांच्या वतीने आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरच्या जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डाॅ.अरुण कोळेकर यांना यावर्षीचा पद्मश्री पु.ल.देशपांडे मुक्तांगण साहित्य व आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
भारतमाता ज्ञानपीठाच्या वतीने गेली ३९ वर्षे ग्रामीण साहित्य संमेलन भरविले जाते.यावर्षी ०३. मार्च २०२२ रोजी ४० वे ग्रामीण साहित्य संमेलन वीटा येथे मा.डाॅ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. या संमेलनात विविध पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे.
डॉ.कोळेकर यांनी आजवर विविध वृत्तपत्रांतून , साहित्य विषयक मान्यवर नियतकालिकांतून , ग्रंथांतून अनेकविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि संशोधनपुर्ण लेखन केले आहे. त्याचबरोबर व्याख्याने , संपादने आणि महाविद्यालयात साहित्य विषयक उपक्रमांचे सातत्याने विद्यार्थ्यांसाठी आयोजन केले आहे. या सर्व साहित्य विषयक आणि शैक्षणिक कामाची दखल घेऊन भारतमाता ज्ञानपीठ , वीटा चे अध्यक्ष रघुराज मेटकरी यांनी प्रा.डाॅ.अरुण कोळेकर पुरस्कार जाहीर केला आहे . डॉ.कोळेकर यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते , सचिव शांताराम पोमण , प्राचार्य डॉ.धनाजी नागणे यांनी त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.