भोर ! वणव्यात जनावरांचा चारा जळून खाक : स्थानिक शेतकरी, नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी वनव्यातुन ज्वारी पीक वाचवण्यात यश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
शासन जंगल,जनावरांचा चारा तसेच वन्यप्राण्यांना वनव्यांपासून बचवण्याचा जिकरीने प्रयत्न करीत असले तरी भोर तालुक्यात दिवसा वणवे लावण्याचे प्रकार घडत असल्याने वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. तर जनावरांचा चारा व जंगले जळूब खाक होत आहेत.
            भोर शहरातील वाघजाई मंदिराशेजारी अनेक शेतकऱ्यांची शेती व जनावरांसाठी राखून ठेवलेले चाऱ्यांचे माळ आहेत.गुरुवार दि-२४ दिवसा अज्ञाताने या माळरानाला आग लावल्याने मोठ्या प्रमाणावर वणवा लागला होता.या वणव्यात अनेक शेतकऱ्यांचे रब्बीतील ज्वारी पीक जळून गेले असते.मात्र स्थानिक शेतकरी व नगरपालिका कर्मचारी यांनी अग्निशमन दलाच्या गाडीच्या सहाय्याने त्वरित दोन ते तीन एकरातील आग विजवून पिके तसेच जनावरांचा चारा वाचवला.
To Top