पुरंदर ! जेजुरीतून दोन अल्पवयीन भाऊ बेपत्ता : अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जेजुरी : प्रतिनिधी 
जेजुरी रेल्वे स्टेशन परिसरात राहणारे सुदाम सोपान बोडरे यांची दोन अल्पवयीन मुले दि 11 फेब्रुवारी पासून बेपत्ता झाली असून या दोघांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे .
             बेपत्ता झालेल्या मुलांची नावे प्रसाद सुदाम बोडरे वय 15 व रविराज सुदाम बोडरे वय 12 रा जेजुरी अशी आहेत. जेजुरी पोलिसांनी या प्रकरणी दिलेली माहिती अशी की फिर्यादी सुदाम बोडरे हे जेजुरी रेल्वे स्टेशन परिसरात राहत असून अगरबत्ती विकण्याचा व्यवसाय करतात . फिर्यादी हे काही कामा निमित्त मुलांना घरी ठेवून बुलढाणा येथे गेले होते . दि 11/2/2022 रोजी रात्री 12.00 वाजण्याच्या सुमारास बुलढाणा येथून ते जेजुरी रेल्वे स्टेशन येथे परत घरी आले असता त्यांची दोन मुले 1) प्रसाद बोडरे वय 15 वर्ष 2) रविराज बोडरे वय 12 वर्ष राहणार जेजुरी रेल्वे स्टेशन घरी मिळून आली नाही . सुदाम बोडरे यांनी आजूबाजूला शेजारी तसेच विटा सांगली येथे नातेवाईकांकडे जाऊन मुलांबद्दल चौकशी केली मात्र ही मुले आढळून आली नाही . कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून माझ्या मुलांना पळवून नेले असल्याची फिर्याद बोडरे यांनी दाखल केली आहे . या प्रकरणी पो उप निरीक्षक गोतपागर व पुंडलिक गावडे तपास करीत आहेत

To Top