सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जेजुरी : प्रतिनिधी
जेजुरी येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सुशील मोहन राऊत यांना कै दिनकरराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय जनसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
कै सावंत प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते . मंगळवार दि 22 रोजी जेजुरी येथील जिजामाता महाविद्यालयात सामाजिक कार्यकर्ते तसेच पुरंदर तालुका नाभिक समाजाचे पदाधिकारी सुशील मोहन राऊत यांना राज्यस्तरीय जनसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
यावेळी पुरंदर पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड,पुरस्कार समितीचे अध्यक्ष व पुणे जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर, समितीचे कार्याध्यक्ष डॉ सुमित काकडे, सचिव संजय सावंत ,भाजपचे शहर अध्यक्ष सचिन पेशवे, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसातन ताकवले, पदाधिकारी रामप्रभु पेटकर आदी यावेळी उपस्थित होते .
सुशील राऊत यांचा जेजुरी पालिकेच्या प्रभाग एक मध्ये पालखी तळाचे सुशोभीकरण, भाजी मंडईचे सुशोभीकरण ,तसेच नागरी सुविधा बाबत त्यांचा पुढाकार आहे . पुरंदर तालुक्यात नाभिक संघटना बळकट करून समाजाच्या मागण्यांसाठी झालेल्या आंदोलन त्यांचा सक्रिय सहभाग आहे . या उल्लेखनीय कार्याबद्दल सुशील राऊत यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला .
या परस्कारा बद्दल पुरंदर तालुका व जेजुरी शहर नाभिक समाज संघटनेचे पदाधिकारी मुन्ना शिंदे, नितीन राऊत, भारत मोरे, राहुल मगर, विजय बापू राऊत,मल्हार राऊत, सागर विभाड,बाळासाहेब भागवत,सुशील गायकवाड, आदींनी सुशील राऊत यांचे अभिनंदन केले.