सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : प्रतिनिधी
भौगोलिक राजकीय परिस्थिती आणि रशिया - यूक्रेन या दोन देशांमधील तणाव याचा अंदाज घेऊन 15 दिवसापूर्वी सोने 50 हजारांचा टप्पा पार करणार असा अंदाज इंडिया बुलिअन अँड ज्वेलर्स असोसिएशन चे राज्य समन्वयक किरण आळंदीकर यांनी दिला होता.
तो तंतोतंत खरा ठरला आहे. कालच बोलताना किरण आळंदीकर यांनी सोने ५२ हजाराचा चा टप्पा पार करेल असा अंदाज दिला होता..तो देखील खरा ठरतोय.. सोने ५२ हजाराच्या जवळपास आज पोचले..भौगोलिक राजकीय परिस्थिती मध्ये बदल झाला नाही तर सोने ५५ हजार तोळ्यापर्यंत जाऊ शकते असे किरण आळंदीकर यांनी सांगितले.