सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद येथील गांधी चौकातील विजय शिंदे यांच्या वैष्णवी ज्वेलरी शॉप मध्ये खोट्या सोन्याच्या बांगड्या विक्री करुन
सोन्याची चैन करयाची आहे असे खऱ्या सोन्याच्या आहेत असे भासवुन फसवणुक करुन विक्री करण्याचा प्रयत्न केला म्हणून तिघा जणाविरोधात लोणंद पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
लोणंद पोलीसातुन मिळालेली अधिक माहिती अशी की,लोणंद ता खंडाळा गावातील गांधी चौकातील विजय शिंदे यांच्या वैष्णवी ज्वेलरी शॉप मध्ये केतन बाळकृष्ण क्षीरसागर वय 32 वर्ष रा अपशिंगे ( मिलीटरी ) ता जि सातारा 2 ) छबूबाई सुभाष धर्माधिकारी रा धुळदेव ता फलटण 3 ) किरण सुभाष धर्माधिकारी वय 40 वर्ष रा धुळदेव ता फलटण जि सातारा यांनी खोट्या सोन्याच्या बांगड्या असुन ते ख - या सोन्याचे असल्याचे सांगुन विक्री करुन सोन्याची चैन करयाची आहे असे ख - या सोन्याच्या आहेत असे भासवुन आमची फसवणुक करुन आम्हाला विक्री करण्याचा प्रयत्न केला म्हणन त्याचे विरुद्द विजय शिंदे यांनी लोणंद पोलीस स्टेशनला फसवणुकीची तक्रार दिली आहे . पुढील तपास लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर करीत आहेत.