सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद येथील नवीन प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्यांचे बांधकाम कोट्यावधी रूपये खर्चूनही निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा दावा पालकांकडून आणि नागरिकांकडून होत आहे.
लोणंद येथील प्राथमिक शाळा क्रमांक एक व दोन साठी जुन्या इमारती जून्या आणि धोकादायक ठरल्यानंतर त्याठिकाणी प्राथमिक शाळेसाठी अनुक्रमे आठ आणि सात अशा नवीन वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या आहेत. या वर्गखोल्यांसाठी शासनाकडून कोट्यावधी रूपयांचा नीधी उपलब्ध होवून सदर खोल्यांचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. मात्र या कामात संबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पालकांकडून होत आहे. यासंदर्भात बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही हे निकृष्ठ काम निरंतर चालूच आहे. त्यामुळे लोणंद मधील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. बांधकाम ठेकेदाराच्या या नियमबाह्य कामावर संबंधित अधिकारी का चुप्पी साधून आहेत हे सामान्य नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर बांधकामात वापरण्यात येत असणाऱ्या वीटा अत्यंत निकृष्ठ दर्जाच्या असून त्या अधिक काळ टिकू शकणार नाहीत तर वाळूच्या ऐवजी वापरण्यात येत असलेली कृत्रिम वाळू देखील अतिशय सुमार दर्जाची असल्याचे नागरीकांचे मत आहे. तसेच या बांधकामावर
या चूकीच्या पद्धतीने होत असणाऱ्या बांधकामास तालुक्यातील एका मोठ्या नेत्याचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे. सदर बड्या नेत्याच्याच चेल्याला या शाळेच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले असल्यानेच बांधकाम विभागाकडूनही नागरिकांच्या तक्रारीस केराची टोपली दाखवण्यात येत असल्याचाही आरोप अनेकजण करत आहेत.
सदर इमारतीचे बांधकाम हे शाळेच्या मालकी हक्कातील मोजणी नकाशात दर्शविलेल्या जागेतच होणे गरजेचे आहे परंतू शाळेच्या मालकीच्या जागेबाहेर बांधकाम गेल्याने लगतच्या शासकीय जागेवर ठेकेदाराकडून अतिक्रमण होत आहे. भविष्यात या जागेवर अतिक्रमण झाल्याने शासकीय प्रकल्प उभारणीसाठी बाधा पोहचु शकतो. इथे शासन नव्हे तर ठेकेदारच कुंपण खात असल्याचे निदर्शनास येत आहे.
COMMENTS